Thursday, 13 August 2026

स्थानिक मच्छीमारांना मासेमारीसाठी संधी मिळावी यादृष्टीने विभाग प्रयत्नशील

 स्थानिक मच्छीमारांना मासेमारीसाठी संधी मिळावी यादृष्टीने विभाग प्रयत्नशील

- मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे

मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे म्हणाले, जलसंपदा विभागाशी समन्वय राखण्यासाठी मत्स्य व्यवसाय विकास आयुक्त यांना जबाबदारी देण्यात येत आहे. मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने जवळपास 2500 धरण आणि तलाव यातील मासेमारीसाठी मच्छीमारांच्या सहकारी संस्थांना संधी दिली जाते. विभागाने याबाबत पारदर्शक व आधुनिकता आणण्यासाठी डिजिटायझेशन, मॅपिंग केले गेले आहे आणि रियल टाईम डाटा सर्विसलेन्स  प्रणाली कार्यरत केली आहे. जलसंपदा विभागाच्या विविध धरणांमध्ये देखील स्थानिक मच्छीमारांना मासेमारीसाठी संधी मिळावी यादृष्टीने विभाग प्रयत्नशील आहे असे मंत्री राणे म्हणाले.

 

जलसंपदा विभागाच्या अंतर्गत धरणांमधील गाळ काढण्यासाठी व जल साठवण क्षमता वाढविण्यासाठी कार्यवाही केली जाते त्या मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या धरणातील व तलावातील गाळ काढण्याची कार्यवाही व्हावी असे मंत्र राणे म्हणाले.

 

यावेळी गोड्या पाण्यातील मासेमारी, सहकारी मच्छीमार संस्था, तलावातील मासेमारीसाठी ठेका पद्धती, दोन्ही विभागांशी संबंधित विविध बाबी, मासेमारीसाठी राबविण्यात येणारी प्रक्रिया आदी विषयाबाबतही चर्चा झाली.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi