जलसंपदा विभागाच्या धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकास
-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
· मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह संयुक्त बैठक
· दोन्ही विभागांच्या माध्यमातून संयुक्त सर्वेक्षण करणार
मुंबई, दिनांक 12:-जलसंपदा विभागाच्या धरणांमध्ये मत्स्यपालन व मासेमारीसंदर्भात मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहकार्य आणि समन्वय वाढवण्यात येणार आहे. स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देता यावे यादृष्टीने दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली संयुक्त समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात येईल , असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे, आमदार प्रकाश सावंत, प्रधान सचिव रामास्वामी एन, लाभक्षेत्र विकास सचिव प्रकाश मिसाळ, मत्स्य व्यवसाय विकास आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, जलसंपदा आणि मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील पुढे म्हणाले, विभागाने उजनी धरणातील मासेमारी विकाससाठी प्रक्रिया राबविण्यासाठी सुरुवात केली गेली आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र विभागातील अशा धरणांची माहिती देखील एकत्रित केली जाईल. जलसंपदा आणि मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या वतीने संयुक्तरित्या अशा धरणांच्या माहितीचा सर्वेक्षण आणि विश्लेषण करून कार्यवाही करण्यास गती देण्यात येईल. यासाठी जलसंपदा विभागाच्या चारही मुख्य अभियंता यांना जबाबदारी देण्यात येत असून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ यामधील धरणांमध्ये मासेमारीच्या दृष्टीने आवश्यक माहिती एकत्रित केली जाईल.
No comments:
Post a Comment