Thursday, 13 August 2026

युवकांनी नेतृत्व घेऊन शासनाच्या उपक्रमांचा अभ्यास करावा, असे

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा  पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सूचनांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी आपल्या अपेक्षा मनमोकळेपणे व्यक्त कराव्यात, मात्र सोबतच युवकांनी नेतृत्व घेऊन शासनाच्या उपक्रमांचा अभ्यास करावा, असे आवाहनही केले. आजच्या डिजिटल युगात उपलब्ध माहितीचा उपयोग करून महाराष्ट्र शासनाच्या योजना, उपक्रम आणि त्यांच्या लाभार्थ्यांची माहिती संकलित करून विद्यार्थ्यांनी दस्तऐवज अथवा माहितीपुस्तिका तयार करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

 

मंत्री पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समाजात जाऊन सामाजिक प्रश्नांचा अनुभव घ्यावा. प्रत्येक विद्यार्थ्याने आठवड्यातून किमान एक तास सामाजिक कार्यासाठी द्यावा. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ठोस सामाजिक उपक्रम हाती घेतल्यास त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य, तसेच आर्थिक पाठबळही देण्याची शासनाची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

संवादादरम्यान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उच्च शिक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध सवलती व योजनांची सविस्तर माहिती दिली. प्रत्येक कॉलेजमध्ये महिला प्राध्यापकांच्या नेतृत्वाखाली नोडल कमिटीस्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच व्हॉट्सॲप आणि डिजिटल माध्यमांतून विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती थेट पोहोचवण्याची यंत्रणाही उभारली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

स्पर्धा परीक्षा आणि सीईटी परीक्षांच्या सुरक्षेबाबत विचारलेल्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले. राज्य सरकार आणि सीईटी सेलने सुरक्षेसाठी ७३ हून अधिक बिंदू निश्चित केले आहेत. सायबर सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने मानवी हस्तक्षेप कमी करून परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यावर भर दिला जात 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi