बाबासाहेब आंबेडकर उद्यानासाठी वाढीव जागेचा प्रस्ताव सादर करा
- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
मुंबई, दि. २१ : कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या विकासासाठी उद्यानालगतची २ एकर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षण बदलाचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावा, असे निर्देश अण्णा बनसोडे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला दिले. जागा उपलब्ध करून देण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठक झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या सुशोभीकरण व विकासासाठी वाढीव जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी उद्यानालगतची सुमारे २ एकर जमीन उद्यानाच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आरक्षण बदलाचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या विकासाला गती मिळावी आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उद्यानाचे नियोजित सुशोभीकरण प्रभावीपणे पूर्ण व्हावे, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आवश्यक कार्यवाही करावी, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले.
बैठकीस नगरविकास विभागाचे अधिकारी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त, नगररचना अधिकारी तसेच आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment