एआय आधारित उपायांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल : निलेश नलवडे
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे यांनी शेतीतील आव्हाने आणि बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने कापूस,सोयाबीन,तूर,ऊस,संत्रे,हळद,कांदा या पिकनिहाय विकसित केलेल्या ‘एआय’ आधारित शेतीतील पिकांची उत्पादकता वाढविण्याचा राज्याचा प्रकल्पाचे सा दरीकरण केले. एआय आधारित ऊस शेतीच्या प्रायोगिक वापरात उत्पादनवाढीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. 200 शेतकऱ्यांच्या नोंदींपैकी 164 वैध नोंदींमध्ये प्रारंभिक सरासरी उत्पादन 65.45 टन प्रति एकर, तर अंतिम सरासरी उत्पादन 73.12 टन प्रति एकर नोंदविण्यात आले. सरासरी उत्पादनवाढ 17.66 टन प्रति एकर वाढली आहे. ‘एआय’ आधारित सिंचन व्यवस्थापनामुळे सरासरी 42 टक्के पाणी बचतीची नोंद करण्यात आली असून, प्रति हेक्टर प्रतिदिन सुमारे 90000 हजार लिटर पाण्याची बचत होऊ शकते.ड्रोनच्या माध्यमातून घेतलेल्या पिकांच्या प्रतिमांचे एआय आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने विश्लेषण करून कीड व रोगांचा प्रारंभिक टप्प्यात शोध घेता येणार आहे.त्यानुसार सिंचन आणि फवारणीचे नियोजन करण्यासाठी संबंधित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्याची संकल्पना आहे.एआय आधारित शेतीच्या अंमलबजावणीत सध्या 10 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना चांगला अनुभव आला आहे.प्रकल्पाचा राज्यात येणारा खर्च हा पिकनिहाय सादर करण्यात आला.राज्यात पिकाचा करण्यात येणारा विस्तार याबाबतीत माहिती सादर करण्यात आली.
0000
No comments:
Post a Comment