Monday, 3 August 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती

 

नागपूर, दि. 2: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘रामगिरी’ येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.

            विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना व्यसनमुक्त, निरोगी आणि सक्षम युवा शक्ती घडविण्याचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. युवकांनी अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून शिक्षण, कौशल्य, क्रीडा आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. व्यसनमुक्त भारत आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन, शैक्षणिक संस्था, पालक, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

            'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत' हे अभियान युवकांमध्ये अमली पदार्थांविरोधात जनजागृती निर्माण करून त्यांना सकारात्मक, निरोगी आणि जबाबदार जीवनशैलीकडे प्रेरित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi