मोफत प्रशिक्षणाची सुविधा
कंपन्यांकडून उपलब्ध होणाऱ्या निधीच्या माध्यमातून शासकीय संस्थांमधील युवकांना हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जात आहे. इन्फोसिस एक्समोबील यांसारख्या कंपन्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम व्यापक स्तरावर राबविणे शक्य होत असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.
‘उन्नती’ ही सोशल स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी व सूचीबद्ध होणारी देशातील पहिली स्वयंसेवी संस्था असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता असून, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment