Wednesday, 26 August 2026

खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद · महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद

 खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

·         महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम

·         पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित

 

मुंबई, दि. २६ : हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी माध्यमातून ' युवा कनेक्ट ' कार्यक्रमांतर्गत देशभरातील १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांना संबोधित करणार आहेत. युवा सहभाग, क्रीडा विकास आणि राष्ट्रनिर्माणावर भर देणाऱ्या या उपक्रमामुळे विविध भागांतील युवक एका समान राष्ट्रीय व्यासपीठावर जोडले जाणार आहेत, अशी माहिती मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या माय भारत -  महाराष्ट्र विभागाचे राज्य संचालक अमित पुंडे यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्रचे राज्य संचालक अमित पुंडे, माय भारत, मुंबईचे उपसंचालक अनूप इंगोले, भारतीय क्रीडा प्राधिकरण (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया - SAI) चे उपसंचालक माधव कांबळे उपस्थित होते.

अमित पुंडे म्हणाले,  महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच मुंबई येथे आयआयटी, पवई येथे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पुणे येथे केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळ (जि. जळगाव) उपस्थित असतील.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi