Wednesday, 26 August 2026

पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

 पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:


- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे


· पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; उत्कृष्ट कार्यप्रणाली पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली दि. २६ : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कार्यप्रणालीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर प्रदान करण्यात आलेला पुरस्कार हा राज्यातील शेतकरी, महिला, युवा, स्वयं सहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था, सूक्ष्म उद्योजका आणि कृषी विभागाच्या अथक मेहनतीची पावती आहे. या सन्मानामुळे कृषीमालाचे अधिकाधिक मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आणि ग्रामीण रोजगाराला बळ देण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे,” असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.


पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कार्यप्रणालीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिरागजी पासवान यांच्याहस्ते कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी संचालक विनयकुमार आवटे व पीएमएफएमईचे स्टेट लीड मॅनेजर अमोल चिद्रावर उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi