Wednesday, 26 August 2026

भारतातील युवक, खेळाडू आणि क्रीडा व्यावसायिकांना एकत्र आणणे हा या

 माय भारत, भारतीय क्रीडा प्राधिकरण  आणि राष्ट्रीय सेवा योजना  यांच्या सहकार्याने देशभरात खेलो इंडिया संवाद आयोजित करण्यात येत आहे. भारतातील युवक, खेळाडू आणि क्रीडा व्यावसायिकांना एकत्र आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन महाविद्यालयांमध्ये युवा कनेक्ट आयोजित करण्यात येणार आहे. आयआयटी पवई, सिम्बॉयसिस आणि एम्स नागपूर  यांसारख्या संस्थांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येईल.

कार्यक्रमात युवकांना खेळाडू, खासदार, आमदार, मंत्री आणि स्थानिक नेत्यांशी थेट संवाद साधता येणार आहे. तसेच भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासाठी आपले विचार आणि आकांक्षा मांडण्याची संधी मिळणार आहे. गेल्या १२ वर्षांतील भारताच्या क्रीडा परिसंस्थेतील परिवर्तनाचा प्रवास अधोरेखित करणे आणि युवकांच्या आकांक्षा जाणून घेणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

सहभागी युवकांना संकेत सरगर, स्वप्नील कुसाळे, रुझा भोसले, प्रीतम साळवे, फाल्गुनी पिल्लई आणि पूर्वा जाधव यांच्यासह नामांकित खेळाडूंशी संवाद साधता येणार आहे. या चर्चेत खेळाडूंचा क्रीडा प्रवास तसेच भारतीय क्रीडा पायाभूत सुविधा आणि क्रीडा परिसंस्थेत झालेल्या परिवर्तनावर चर्चा केली जाईल, असेही यावेळी पुंडे यांनी सांगितले.

युवा संवादात क्रीडा परिसंस्था मजबूत करणे, २०३६ ऑलिम्पिकसाठी वैज्ञानिक पद्धतीने प्रतिभा ओळखून खेळाडू विकसित करणे, युवा नेतृत्वाला शासन प्रक्रियेत अर्थपूर्ण सहभागासाठी प्रोत्साहन देणे आणि विकसित भारतासाठी युवकांना आवश्यक कौशल्ये, स्वयंसेवा व राष्ट्रनिर्माणाच्या संधींशी जोडणे या चार प्रमुख विषयांवर विचारमंथन होणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

युवकांच्या सूचना क्यूआर कोडद्वारे संकलित करून त्यांच्या कल्पना आणि विचारांची नोंद केली जाईल. सहभागींना कार्यक्रमस्थळी व्हीबीवायएलडी क्विझ मध्ये सहभागी होण्यासाठीही प्रोत्साहित करण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi