जगातील सर्वात मोठ्या चित्रपट सहनिर्मिती प्रकल्पांपैकी एक असलेल्या 'रामायण' चित्रपटाची निर्मिती या स्टुडिओमध्ये होत असल्याचा विशेष उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. भारतीय सर्जनशीलतेचा जागतिक स्तरावरील उत्कृष्ट नमुना म्हणून हा चित्रपट ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युवा पिढीच्या सर्जनशील क्षमतेला वाव देणे, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे आणि मनोरंजन उद्योगासाठी सक्षम परिसंस्था उभारणे यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. फिल्मसिटीचे जागतिक दर्जाच्या सर्जनशील आणि मनोरंजन केंद्रामध्ये रूपांतर करण्याचा व्यापक पुनर्विकास आराखडाही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली
No comments:
Post a Comment