फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, उपस्थित होते
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईत जागतिक दर्जाची सुविधा उभारून जगभरातील मनोरंजन आणि सर्जनशील उद्योगांना सेवा देण्याचा प्राइम फोकसचा संकल्प आज प्रत्यक्षात उतरला आहे. शासनाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य केल्याचे सांगून 'वेव्ह्स 2025' परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या एका वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला, ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहासामध्ये असंख्य प्रेरणादायी कथा दडलेल्या आहेत. या कथा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सक्षम सर्जनशील परिसंस्थेची गरज आहे. प्राइम फोकसची ही सुविधा त्या दृष्टीने देशासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
No comments:
Post a Comment