आधुनिक सुविधा व दर्जेदार शिक्षणातून महाराष्ट्राला आरोग्य आणि
वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याचा निर्धार
– वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. ६ : शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयांत गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयांप्रमाणे अत्याधुनिक सुविधा, जागतिक दर्जाचे शिक्षण आणि उत्कृष्ट प्रशिक्षण उपलब्ध करून देणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या नूतनीकरण केलेल्या मध्यवर्ती सभागृहाचे, मुखरोग निदान व क्ष-किरण शास्त्र विभागाचे तसेच सेंट जॉर्ज रुग्णालयातील विविध अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.त्यावेळी मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त अनिल भंडारी, संचालिका डॉ पल्लवी सापळे,शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. डिंपल पाडावे, सहसंचालक विवेक पाखमोडे, वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, विद्यार्थी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले,शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई ही देशातील सर्वांत जुनी आणि प्रतिष्ठित दंत शिक्षण संस्था असून दंत शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा या तिन्ही क्षेत्रांत संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे. राज्य शासनाच्या सुमारे १० कोटी रुपयांच्या निधीतून मध्यवर्ती सभागृहाचे अत्याधुनिक स्वरूपात श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. या पूर्ण वातानुकूलित सभागृहात ४८० आसने, आधुनिक ध्वनी व ऑडिओ-व्हिज्युअल प्रणाली, उच्च दर्जाची प्रोजेक्शन व्यवस्था, व्यावसायिक प्रकाशयोजना, स्वतंत्र ग्रीन रूम आणि आधुनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यात आली आहेत. हे सभागृह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि सांस्कृतिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री
No comments:
Post a Comment