Saturday, 1 August 2026

बालकांच्या संरक्षणासाठी राज्याची बांधिलकी

 बालकांच्या संरक्षणासाठी राज्याची बांधिलकी

 

बालक हे देशाचे भविष्य असून त्यांच्या सुरक्षित, सन्मानित आणि सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही शासन आणि समाजाची संयुक्त जबाबदारी आहे. बालकांवरील अत्याचार, शोषण,  भेदभाव,  बालमजुरी,  बालविवाह,  लैंगिक अत्याचार,  ऑनलाईन छळ, शिक्षणापासून वंचित राहणे किंवा मानसिक त्रास अशा कोणत्याही परिस्थितीत त्यांना तातडीने संरक्षण आणि न्याय मिळावा, यासाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग कार्यरत आहे. बालकांच्या संविधानिक आणि कायदेशीर हक्कांचे रक्षण करणे, त्यांच्या तक्रारींची दखल घेणे आणि संबंधित यंत्रणांमार्फत प्रभावी कार्यवाही सुनिश्चित करणे हे आयोगाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi