Friday, 21 August 2026

स्थानिक पशुपालकांना होणार फायदा

 स्थानिक पशुपालकांना होणार फायदा

– डॉ. किरण पाटील

राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळाल्यामुळे आता उमरडा या गोवंशाच्या व माडग्याळ या मेंढी प्रजातीच्या जतन, संवर्धन व सुधारित प्रजननासाठी सरकारी स्तरावर विशेष योजना व निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे स्थानिक पशुपालकांना मोठा फायदा होईल. महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, पुणे व महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर तसेच संशोधन क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांच्या प्रदीर्घ अभ्यास व सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे. राष्ट्रीय स्तरावर अधिकृत नोंदणी मिळाल्यामुळे या प्रजातींच्या शास्त्रीय जतन, प्रजनन सुधारणा व गुणवत्ता वाढीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विशेष योजना राबवणे आता अधिक सोपे होणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर पशुपालकांचे उत्पन्न वाढण्यास व  ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास मोठी मदत होईल, असे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi