Thursday, 20 August 2026

महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान 'उमरडा' गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर माडग्याळ मेंढी प्रजातीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता

 3192

·        महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान

'उमरडा' गाईला स्वतंत्र देशी गोवंश, तर माडग्याळ मेंढी प्रजातीला

राष्ट्रीय स्तरावर मान्यता

           

            मुंबई, दि. २०: महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या उमरडा या गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर  'माडग्याळ' प्रजातीच्या मेंढीला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र व अधिकृत प्रजाती (ब्रीड) म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे राज्यातील उमरडा या स्थानिक गोवंशाचे व माडग्याळ या मेंढी प्रजातीचे संवर्धन, जतन व आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांना मोठी चालना मिळणार आहे.

            महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो, करनाल (हरियाणा) या संस्थेला पाठवलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ‘भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या’ (आयसीएआर) राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्यूरो, करनाल (हरियाणा) चे संचालक डॉ. एन.एच. मोहन यांनी याबाबतचे अधिकृत पत्र जारी केले आहे. ७ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या 'आयसीएआर ब्रीड रजिस्ट्रेशन कमिटी'च्या १४ व्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

            पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाचा पाठपुरावा आणि संशोधनात पुण्यातील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ', महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर तसेच कर्नाटक येथील कृषी व पशुवैद्यकीय विद्यापीठातील तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन डॉ. शितलकुमार मुकणे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi