Friday, 21 August 2026

उमरडा गोवंशाविषयी

 उमरडा गोवंशाविषयी

अमरावती जिल्ह्याचे ब्रिटिशकालीन गॅझेटमधील (१९१०) नोंदीवरून उमरडा गोवंश गेल्या शतकापासून आपले अस्तित्व राखून असल्याचे सिद्ध होत आहे. बंजारा समाजाव्यतिरिक्त स्थानिक पशुपालकांकडून देखील उमरडा गोवंशाचा सांभाळ केला जात आहे. पश्चिम विदर्भातील यवतमाळ जिल्हा व लगतच्या अमरावती आणि वाशीम जिल्ह्यात अंगकाठीने उंचपुरी, पांढऱ्याशुभ्र रंगाच्या गोधनाचा सांभाळ बंजारा समाजाकडून पारंपरिक पद्धतीने होत असून त्यांना उमरडा गोवंश म्हणून ओळखले जाते.

            वाशीम जिल्ह्यातील उंबर्डा बाजार या पशुधन बाजारपेठेवरून उमरडा हे नाव स्थानिक गोवंशाला प्राप्त झालेले असून यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यावरून या गोवंशाला दिग्रस किंवा बंजारा समाजावरून बंजारा गोवंश म्हणून देखील संबोधले जाते. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, दारव्हा, आर्णी तालुके, वाशीम जिल्ह्यातील मानोरा, मंगरुळपीर, कारंजा (लाड) हे तालुके आणि अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर या तालुक्यात मोठ्या संख्येने उमरडा गोवंश आढळून येतो.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi