Monday, 31 August 2026

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत मानसिक आरोग्याचे संगोपनही गरजेचे -

 विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत मानसिक आरोग्याचे संगोपनही गरजेचे

-         महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई, दि. ३१ : बदलत्या काळातील वाढती स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या मानसिक आरोग्याचे संगोपन करणे काळाची गरज आहे. यश आणि अपयश हे आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

 

अंजुमन-ए-इस्लाम संचलित सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) इंडिया आणि यामा पटेल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक उपक्रमात गरजू पालकांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या.

 

यावेळी अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. झहीर आय. काझी, सैफ तय्यबजी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या अमीना काझी, अंजुमन-ए-इस्लामचे वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष हाजी हसीन आघाडी, यामा पटेल फाउंडेशन तसेच डब्ल्यूएमओ मुंबईचे शहर अध्यक्ष हाजी मुदस्सर पटेल, हाजी इम्तियाज मोटरवाला, नसीन मकलाई, हुरिया पटेल आणि मुमताज परफ्यूमवाला यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi