Tuesday, 21 July 2026

संतपरंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करावा

 संतपरंपरेचा वारसा जपत तीर्थक्षेत्रांचा विकास करावा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         गंगाखेड, अमरावती व काटोलच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी

·         ११५ कोटींच्या विकासकामांना मिळणार गती

·         आराखड्यातील कामे  दर्जेदार व निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश

 

मुंबई, दि. २० : संतपरंपरेचे जतन करत आध्यात्मिक वारसा जपत धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी ४८.५५ कोटी, अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळासाठी २५ कोटी आणि नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरसाठी ४१.७५ कोटी या तीन  तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांना एकूण  ११५ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. आराखड्यातील सर्व कामे उत्सव काळातील भाविकांची संख्या लक्षात घेवून दर्जेदार पद्धतीने व टप्प्याटप्प्याने  निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi