मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाचे सामंजस्य करार
वनविभागाच्या पुढील वाटचालीसाठी व व्याघ्र संवर्धनाच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात महत्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. या आयआरसीटीसी आणि वनविभागादरम्यान शाश्वत वन्यजीव पर्यटनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
बायएफ आणि वनविभाग यांच्या एचडीएफसी बँकेच्या परिवर्तन सीएसआर उपक्रमाद्वारे नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात समृद्धी प्रकल्प राबविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
आरोहा ग्रुप, महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट इंडिया लिमिटेड आणि महाराष्ट्र वनविभाग यांच्यात शाश्वत पर्यटनावर आधारित पंचतारांकित लक्झरी प्रकल्प विकसित करण्यासाठी सामंजस्य करार असे एकूण 11 सामंजस्य करार करण्यात आले.
'समुदाय आधारित जीवनोपयोगी उपक्रम आणि हरित अर्थव्यवस्था','व्याघ्र संवर्धनासाठी सीएसआर गुंतवणूक','महाराष्ट्र-भारताचे प्रमुख वाघ (टायगर) पर्यटन गंतव्यस्थान' आणि 'मनुष्य-वाघ सहअस्तित्व आणि परिसंस्थेचे संवर्धन' विषयांवर विषयतज्ज्ञांचे सादरीकरण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय कार्यासाठी एशियाटिक बिग कॅट सोसायटीचे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
तत्पूर्वी, प्रधान वनसंरक्षक एम एस रेड्डी यांनी प्रास्ताविक केले. मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांनी नागपूर ग्रोथच्या माध्यमातून व्याघ्र संवर्धनासाठी करण्यात आलेल्या विविध उपाय योजनांबाबत माहिती दिली. नागपूर विभागाचे वनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment