जालना जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन करावे
-ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबई, दि. २१:- जालना जिल्ह्यातील शेतकरी, घरगुती ग्राहक, व्यावसायिक आणि उद्योगांना पुरेशा दाबाने विद्युत पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे. जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून आवश्यकतेनुसार वाढीव मागणीची गरज लक्षात घेऊन नवीन डीपीआर तयार करावा, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.
जालना जिल्ह्यातील ऊर्जा विभागातील प्रलंबित प्रश्नाचा आढावा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला. या बैठकीस आमदार अर्जुन खोतकर, आमदार हिकमत उढान, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार नारायण केचे व आमदार संतोष दानवे यांच्यासह ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment