Wednesday, 8 July 2026

कात्रज डेअरीतील तक्रारींची दोन महिन्यांत चौकशी

 कात्रज डेअरीतील तक्रारींची दोन महिन्यांत चौकशी

-मंत्री अतुल सावे

 

मुंबई, दि. ७ : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) संदर्भातील तक्रारींची सखोल चौकशी करून दोन महिन्यांत अहवाल सादर केला जाईल. अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.

 

याबाबत सदस्य योगेश टिळेकर लक्षवेधी सूचना यांनी मांडली. यावेळी चर्चेत सदस्य सदाभाऊ खोत, बच्चू कडू, अरुण लाड यांनी सहभाग घेतला.

 

मंत्री अतुल सावे म्हणाले, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) संदर्भात २ जून २०२६ रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर १० जून रोजी विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), पुणे यांना चौकशीचे आदेश देण्यात आले. त्यानुसार ११ जून रोजी सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), पुणे आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांची द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याचाही या समितीत समावेश केला जाईल. सदस्यांनी केलेल्या लेखी निवेदनातील सर्व मुद्द्यांची सविस्तर चौकशी करण्यात येणार असून बोगस दूध संस्था किंवा आर्थिक गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

 

मंत्री सावे यांनी सांगितले की, दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत राज्यभर कडक कारवाई सुरू असून, त्यामुळे भविष्यात भेसळ करण्याचे धाडस कोणी करणार नाही, असा विश्वासही मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. तसेच दूध दराबाबत सदस्यांनी केलेल्या सूचनाही मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi