परिणाम केंद्रीत कार्यपद्धती असावी
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपचारांची व्यवस्था करण्यात येते. मात्र या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून व्यवस्थेपूर्वी असलेली उपचार घेत असलेली रुग्णसंख्या आणि व्यवस्थेनंतरची रुग्णसंख्या, मिळणारे लाभ अशा परिणामकेंद्रीत (आउट कम बेसिस) पद्धतीवर आधारित कार्यवाही करावी. त्याचबरोबर आऱोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास
क्षेत्रातील प्रत्यक्ष बदल मोजून धोरणांमध्ये सुधारणा करावी. परिणाम आणि प्रभाव यावर आधारित प्रशासनाची कार्यसंस्कृती विकसित केली जावी. राज्याकडे निधी, मनुष्यबळ आणि प्रशासकीय क्षमतेच्या स्वरुपात विपुल संसाधने उपलब्ध आहेत. या सर्व संसाधनांचा अधिक प्रभावी वापर करून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यावर भर दिला जावा. सध्याची धोरणे आणि कार्यपद्धती यांच्या अंमलबजावणीमधील कमतरता, त्रुटी शोधून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या क्षेत्रातील निर्देशांकामध्ये राज्य पुढे आहे, त्या क्षेत्राच्या प्रगतीमध्ये सातत्य ठेवावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
निती आयोगाने दिलेले शाश्वत विकास निर्देशांक (एसडीजी) डोळ्यासमोर ठेवून विकासाचे नियोजन करावे. निती आयोगाचा हा राज्याच्या प्रगतीचा आरसा समजावा. नीती आयोगाने दिलेल्या निर्देशांकातील प्रगतीचा आढावा यापुढे दर तीन महिन्यांनी घेण्यात यावा. तसेच मुख्य सचिव यांच्या स्तरावरही नियमित निरीक्षण केले जावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
राज्याच्या आकांक्षित क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीतून होणाऱ्या परिणामांचा नियमित आढावा घेतला पाहिजे. एसडीजी उद्दिष्टांवरील कामगिरी ही सर्व अधिकाऱ्यांच्या अपार प्रणालीत प्रमुख कामगिरी निर्देशांक (केपीआय) अनिवार्य करण्यात यावा असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment