Thursday, 23 July 2026

रिअल टाइम डेटा महत्वाचा

 रिअल टाइम डेटा महत्वाचा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विभागाने आपल्याशी सबंधित निर्देशांकाचा अभ्यास करून प्रगती साधण्यासाठी कार्यपद्धती, धोरणांमध्ये सुधारणा कराव्यात. अग्रक्रमाच्या राज्यांमधील सर्वोत्तम कार्यपद्धती, संकल्पना, धोरणांचा अभ्यास करून राज्याची कामगिरी उंचावण्यावर भर द्यावा. शासन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी विभागांनी 'रिअल टाइम डेटा'चे संकलन करून त्यावर विश्लेषणात्मक व अन्य राज्यांच्या निर्देशांकासोबत तुलनात्मक अभ्यास करावा. राज्यामध्ये डेटा संकलित करण्याची अधिक मजबूत करण्यात यावी. योजनांच्या अंमलबजावणीचे सतत मूल्यमापन करून तत्काळ आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात.

 

काही निर्देशांकांमध्ये राज्याच्या प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा उपलब्ध आकडेवारी वेगळी चित्र दाखवत असल्यास डेटा गॅप शोधून काढणे आवश्यक आहे. त्यासाठी दुय्यम डेटासोबतच प्राथमिक आणि रिअल टाइम डेटा संकलनाची व्यवस्था अधिक सक्षम करावी. उपलब्ध विविध डेटाबेसचे विश्लेषण करून कोणत्या भागात किंवा कोणत्या क्षेत्रात मागे आहोत, हे ओळखून त्यानुसार तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi