Friday, 31 July 2026

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार -

 कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार

-         सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई, दि. ३१ : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका व परिसरातील आरोग्यसुविधा सक्षम करण्यात येणार आहेत. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, शिरोळ ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन प्रशस्त इमारत, कुरुंदवाड येथे महिला रुग्णालय; तसेच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांच्या उभारणीसंदर्भातील प्रस्तावांना गती देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

मुंबईत आरोग्य भवन येथील कार्यालयात आयोजित बैठकीत शिरोळ तालुक्यातील विविध आरोग्यविषयक  प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आरोग्य सेवा आयुक्त, संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, संचालक, डॉ.नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोलाईत यांच्या सह जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर (दूरदृष्य प्रणालीद्वारे)उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi