महिला केवळ परिवर्तनाच्या अग्रस्थानी : अनुप्रिया पटेल
आज महिला तळागाळापासून तर उद्योग जगतातील मोठमोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत. विकास प्रक्रियेत त्या केवळ सहभागी होत नसून परिवर्तनाच्या अग्रस्थानी आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांनी उपस्थितांना केंद्र शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या कार्याची माहिती दिली. मातेचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच माता मृत्युदर कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आल्याचे सांगून त्यांनी 'नारीशक्ती वंदन' अधिनियम व 'पोषण अभियान' उपक्रमाची माहिती दिली.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून महिलांचे रक्षण करण्यासाठी केंद्र शासनातर्फे एचपीव्ही लस देण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी 'आयुष्मान भारत' योजना, 'जनऔषधी औषधालये, लखपती दीदी, नमो ड्रोन आदी योजनांची माहिती दिली.
सुरुवातीला राज्यपालांच्या हस्ते 'फॉर्च्युन इंडिया' मासिकाच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. आरपी संजीव गोयंका समूहाचे उपाध्यक्ष शाश्वत गोयंका यांनी प्रास्ताविक केले तर 'फॉर्च्युन इंडिया'चे मुख्य संपादक सौरव मुजुमदार यांनी आभारप्रदर्शन केले.
उदघाटन सत्राला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान, रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, कॉर्पोरेट लॉ फर्म एझेडबी अँड पार्टनर्सच्या सह संस्थापिका झिया मोदी, नीरजा बिर्ला यांसह उद्योग, व्यवसाय, बँकिंग क्षेत्रातील प्रभावी महिला उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment