महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात आषाढी एकादशी, तसेच पंढरपूरची वारी यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संतपरंपरेतील संतांच्या अभंगवाणीने महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेला समृद्ध केले आहे. या समृद्ध भक्तीपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने ‘कानडा राजा पंढरीचा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच भक्तिसंगीत, संतपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, मुंबई व परिसरातील विठ्ठलभक्त, वारकरी, संगीतप्रेमी, कला रसिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिरसपूर्ण सांगीतिक अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment