Monday, 20 July 2026

भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला गती देत पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना

 भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला गती देत पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना


- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार


· जिल्हा नियोजन निधीतून ४५ कोटी रुपयांचा निधी मं

मुंबई, दि. २० : मुंबई उपनगराच्या भांडूप येथील महत्त्वाकांक्षी भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाच्या उभारणीला गती मिळाली असून, पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ४५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची माहिती, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.


मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.शेलार यांनी भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाची पाहणी केली. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक आमदार मिहीर कोटेचा, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका हेतल गाला मोरवेकर, दीपिका घाग आणि अधिकारी उपस्थित होते.


 आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य क्षेत्रात हा प्रकल्प प्रस्तावित असून, भांडूप पंपिंग स्टेशनलगत ठाणे खाडीच्या किनारी सुमारे २०.०९ हेक्टर क्षेत्रात त्याची उभारणी करण्यात येणार आहे. यापैकी केवळ ०.३५ हेक्टर क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक व कमी हस्तक्षेपाच्या तत्त्वावर पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi