Friday, 24 July 2026

मुंबईत अत्याधुनिक वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करा

 मुंबईत अत्याधुनिक वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही करा

                                                                - मंत्री ॲड. आशिष शेलार

 

            मुंबई, दि. 23 : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांवरील टाकाऊ व बेवारस वाहनांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्हीएसएफ) उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

            

            राज्यात जालना, तळोजा, धाराशिव, पालघर, भिवंडी, खालापूर आदी ठिकाणी वाहन स्क्रॅपिंग सुविधा उपलब्ध असल्या तरी मुंबई परिसरात अधिकृत केंद्र उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद अत्यल्प आहे. मुंबईत सुमारे 53 लाख वाहने असून त्यामध्ये सुमारे 15 लाख चारचाकी, 30 लाखांहून अधिक दुचाकी आणि 5 ते 6 लाख व्यावसायिक वाहने आहेत. देशातील सर्वाधिक वाहन घनता मुंबईत असून यामुळे वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि रस्त्यांवरील ताण वाढत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi