Friday, 24 July 2026

पुणे, नागपूर येथेही भारत टॅक्सी सेवा सुरु करणार

 पुणे, नागपूर येथेही भारत टॅक्सी सेवा सुरु करणार


                                                        -मुरलीधर मोहोळ


केंद्रीय राज्यमंत्री (सहकार आणि नागरी विमान वाहतूक, भारत सरकार) मुरलीधर मोहोळ म्हणाले की, 'सहकार टॅक्सी' संस्थेमुळे चालक आता कर्मचारी न राहता थेट सभासद व मालक बनले आहेत. संस्थेच्या नफ्याचा लाभांश (डिव्हिडंड) आता थेट चालकांच्या खात्यात जमा होणार आहे. देशभरातून सुमारे ८ लाख चालक या संस्थेशी जोडले गेले असून, अल्पावधीत ७७ कोटी रुपये कोणत्याही कमिशनशिवाय थेट चालकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. दिल्ली आणि गाझियाबादपाठोपाठ आज मुंबई महानगरात ही सेवा सुरू झाली असून, लवकरच पुणे आणि नागपूर येथेही तिचा विस्तार केला जाईल.

महाराष्ट्रातील सहकाराला बळकटी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्यांना १०,००० कोटी रुपयांची मदत मिळाली असून, संस्थांच्या डिजिटायझेशनसाठी २,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 'सहकारातून समृद्धी' या अभियानात राज्यातील सर्व चालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi