Thursday, 30 July 2026

मूल्यप्रस्तावाधारित व्याघ्र संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील

 मूल्यप्रस्तावाधारित व्याघ्र संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील


- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


§ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा

             नागपूर, दि. 29 : नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टीकोणातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे. हे कार्य पुढे घेवून जाण्यासाठी नवी पंचसूत्री आखण्यात आली आहे. तसेच मुल्यप्रस्तावाधारित व्याघ्र संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाच्या औचित्याने वन विभागाद्वारे येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत (आयआयएम) आयोजित परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. वनमंत्री गणेश नाईक, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्रीनीवास राव यांच्यासह कंबोडीया, भूतान आणि बांग्लादेशातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi