नागपुरातील कौशल्य विकास विद्यापीठासाठी जागेचा निर्णय महिनाभरात
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पारडी परिसरात उभारण्यात आलेल्या नागपूर स्कील सेंटरचे उद्घाटन
नागपूर, दि. २६ : जिल्ह्यातील प्रस्तावित कौशल्य विकास विद्यापीठासाठीच्या जागेचा निर्णय महिनाभरात होणार असून हे विद्यापीठ देशातील सर्वोत्तम असे कौशल्य विकास विद्यापीठ ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केली.
विदर्भातील उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने नागपुरात पारडी परिसरात एआयडी, टाटा स्ट्राईव्ह, नागपूर महानगरपालिका आणि विदर्भ ग्लोबल फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या नागपूर स्किल सेंटरच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे बोलत होते. केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हथीबेड, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, संजय भेंडे, डॉ. राजीव पोतदार, माजी खासदार अजय संचेती, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी, महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर हे मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment