Wednesday, 1 July 2026

ठाणे जिल्ह्यातील रेड व ऑरेंज झोनमधील उद्योगांबाबत बैठक घेणार

 ठाणे जिल्ह्यातील रेड व ऑरेंज झोनमधील उद्योगांबाबत बैठक घेणार


-पर्यावरण मंत्री पंकजा मुंड

मुंबई, दि. ०१ : ठाणे जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रेड व ऑरेंज झोनमधील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्यात येईल असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रमोद जठार, अनिल परब, ज्ञानेश्वर म्हात्रे, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले.


कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (सीईटीपी) ही व्यवस्था सहकार विभागाऐवजी एमआयडीसीमार्फत चालविली जाते. लहान आणि मध्यम उद्योगांना स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे सामूहिक प्रक्रिया केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये हीच पद्धत राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. समित्यांच्या सुनावण्या अधिक पारदर्शक करण्यासाठी त्या ऑनलाइन किंवा इन-कॅमेरा पद्धतीने घेण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.


0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi