‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ हा माहितीपट 22 मिनिटांचा आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलगू, बंगाली, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये डबिंग करुन त्याचे डिस्कव्हरीच्या विविध उपग्रह वाहिन्यांवरुन प्रसारण करण्यात येत आहे. त्यात डिस्कव्हरी, डिस्कव्हरी एचडी, टीएलसी, टीएलसी एचडी, अॅनिमल प्लॅनेट, अॅनिमल प्लॅनेट एचडी, इन्व्हेस्टिगेशन डिस्कव्हरी (आयडी), डिस्कव्हरी सायन्स आणि डिस्कव्हरी टर्बो अशा नऊ वाहिन्यांचा समावेश आहे.
‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे डिजिटल युगातले एक सदस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. वारीतील समतेची पाऊलवाट अत्यंत भक्तिभावाने पडद्यावर प्रकट होते. चिखल- माती तुडवत, अबीर-गुलालाची उधळण, रिंगण सोहळ्यात धावणारे अश्व आणि चंद्रभागेच्या तीरावरील अथांग भक्तिसागर... प्रत्येक फ्रेममधून जणू विठ्ठलनामाचा गजर थेट हृदयाचा ठाव घेतो.
No comments:
Post a Comment