Friday, 10 July 2026

सांस्कृतिक संचित जगासमोर

 सांस्कृतिक संचित जगासमोर: मुख्यमंत्री फडणवीस

“देशातल्या भक्ती मार्गातली वारी ही सर्वात प्राचीन परंपरा आहे, ती सर्वांना मोठी ऊर्जा देते. धर्म- जात, भाषा, गरीब- श्रीमंत, असा कुठलाही भेद न करता सर्वांना विठूरायाच्या रंगी रंगविणारी माऊलीची ही वारी महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. ही परंपरा आणि संचित जगासमोर आले पाहिजे,

यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी वाहिनीच्या माध्यमातून नेत्रदीपक माहितीपट तयार करण्यात आला आहे. वारीचे उद्दिष्ट काय? त्या मागची प्रेरणा काय? त्यात सहभागी होणाऱ्यांच्या मनातले विचार काय? वारीची पद्धती काय? हा सगळ्यांचा उलगडा या माहितीपटातून होतो. आपण विश्वात्मकेसाठी देवाला साकळे घालणारे लोक आहोत, याची प्रचिती या माहितीपटातून येते,” असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी काढले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi