Saturday, 6 June 2026

कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवरून बियाणेसादर करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

 यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, "राज्यातील शेतकऱ्यांना वेळेत आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टलवरून बियाणे वितरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे बियाणे वाटप प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, सुलभता आणि वेग येणार आहे. शेतकऱ्यांनी कोणतीही प्रतीक्षा न करता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा."

 

ते म्हणाले, "खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यवस्थेच्या माध्यमातून कृषी सेवा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन खरीप हंगामाची तयारी वेळेत पूर्ण करावी."

 

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर जाऊन बियाणे वितरण, प्रात्यक्षिके, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते या शीर्षकाअंतर्गत अर्ज करावेत. अर्ज प्रक्रियेसाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.

 

तसेच जास्तीत जास्त शेतकरी गटांनी पीक प्रात्यक्षिके या घटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.   प्रात्यक्षिके व बियाण्यांच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi