Sunday, 28 June 2026

Google, Microsoft, Jio, Amazon आणि इतर अग्रगण्य संस्थांच्या तज्ज्ञांनी डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड सोल्यूशन्स

 महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा पैठणी, नारायणपेठ आणि करवती काठ साड्या, गोधडी तसेच विविध हस्तकला व One District One Product (ODOP) उत्पादनांचा विशेष रॅम्प वॉक कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला. या माध्यमातून महाराष्ट्राच्या पारंपरिक कौशल्यांना आणि स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर प्रभावी व्यासपीठ मिळाले.


*चार महत्त्वपूर्ण परिसंवादांचे आयोजन*
परिषदेत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहभागातून खालील विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले :
• एमएसएमई निर्यातीसाठी वित्तीय सुविधा व व्यापार सुलभीकरण
• जागतिक विस्तार, मुक्त व्यापार करार (FTA) आणि एमएसएमई विकास
• महिला उद्योजकांसाठी जागतिक व्यवसाय संधी
• डिजिटल व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित एमएसएमई परिवर्तन

Google, Microsoft, Jio, Amazon आणि इतर अग्रगण्य संस्थांच्या तज्ज्ञांनी डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड सोल्यूशन्स आणि जागतिक स्पर्धात्मकतेबाबत मार्गदर्शन केले.
*महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६ प्रदान*
राज्यातील उत्कृष्ट उद्योजक, निर्यातदार आणि हस्तकला कारागिरांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आले.
राज्य हस्तकला उत्कृष्टता, हस्तकला MSME, NextGen MSME, डिजिटल व AI MSME, सेवा क्षेत्र MSME, उत्पादन क्षेत्र MSME, हरित MSME, महिला MSME, निर्यात MSME आणि Champion MSME अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.
RAMP कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या फ्लॅटेड फॅक्टरी भाडे अनुदान योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या चार MSME उद्योजकांना प्रत्येकी ₹३०,००० पर्यंतच्या अनुदानाचे धनादेश उद्योग मंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi