सत्यमेव जयते फार्मर कपचा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई,दि.28: पानी फाऊंडेशन मार्फत 2022 पासून 'सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा' महाराष्ट्रात 46 तालुक्यात सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पानी फाऊंडेशन यांच्या प्रयत्नाना सुरूवातीपासूनच साथ लाभली आहे. विविध टप्प्यात शेतक-यांसाठी काम करत असलेल्या 'सत्यमेव जयते फार्मर कप 2026' चा शुभारंभ सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता मुंबई येथे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23 मार्च 2025 रोजी फार्मर कप 2024 मधील शेतकरी गटांना सन्मानित करताना फार्मर कप उपक्रमाचा संपूर्ण महाराष्ट्रात 351 तालुक्यात विस्तार करावा अशा सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग, ग्रामविकास मधील महिलांच्या उपजीविकेसाठी काम करणारी उमेद व पानी फाऊंडेशन यांच्या सहभागातून शेतकऱ्यासाठी जनचळवळ उभी करण्यासाठी एकत्र विविध टप्प्यावर कार्यवाही सुरू आहे.
No comments:
Post a Comment