राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर;
२२६ तपासण्या पूर्ण; ५१ संस्था बंद
§ पुणे विषारी दारू प्रकरणानंतर कारवाई
मुंबई, दि. ६ : पुण्यातील विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर पुढील ७ दिवसात पूर्ण कराव्यात आणि कायदा व नियमातील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या संस्थाविरुद्ध कठोर कारवाई करावी असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
कायदयातील तरतुदीचे उल्लंघन बाबत ३ जून २०२६ अखेर एकूण २२६ तपासण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच उल्लंघन आढळलेल्या प्रकरणी गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. औषधी वनस्पती पासून प्राप्त होणारे विषारी द्रव्यांचा उपयोग औषधांचे उत्पादनात होत असल्याने व सदर विषारी द्रव्ये महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ (Maharashtra Poisons Rules 1972) च्या अनुसूचिमध्ये समाविष्ठ असल्याने सदर नियामाखाली परवाने मंजुरी प्रधिकार १९७७ मध्ये आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, (महाराष्ट्र राज्य) यांना देण्यात आले आहेत. संबधित कार्यक्षेत्रात सहायक आयुक्त (औषधे) परवाने मंजुरी प्राधिकारी आहेत.
राज्यातील सर्व घाऊक / किरकोळ मेथॉनोल परवाने धारकांनी, विषारी द्रव्ये, १९१९ व महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, १९७२ अंतर्गत नियम व परवान्याच्या अटींचे तंतोतत पालन करावे. नियमांचे उल्लघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल विषारी द्रव्ये अधिनियम व भारतीय न्याय संहिता, २०२३ कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी असा इशारा दिला आहे.
जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध शासनाकडून कडक कारवाई करण्यातयेत आहे. औषधांच्या बाबतील बेकायदेशीर कामकाज करणाऱ्या कोणत्याही संस्था वा व्यक्ती आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment