Thursday, 25 June 2026

विविध प्रणालीबद्दल थोडक्यात माहिती

 विविध प्रणालीबद्दल थोडक्यात माहिती

महा-डीबीटी २.०  : महा-डीबीटी २.०  ही प्रणाली इलेक्ट्रॉनिक्स,माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने विकसित केली असून सर्व डीबीटी योजनांसाठी एकच पोर्टल आहे. सिंगल साइन-ऑन, डॅशबोर्ड व डेटा विश्लेषण सुविधा आहे. अर्जातील माहिती १३८ वरून ६६ क्षेत्रांपर्यंत कमी केली आहे. आधार आधारित पडताळणी व जलद लाभ वितरण.

आपले सरकार सेवा केंद्र मानांकीकरण : आपले सरकार सेवा केंद्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागातंर्गत राज्यातील ३१ हजारांहून अधिक सेवा केंद्रांचे मानांकीकरण. एकसमान ब्रँडिंग व सेवा गुणवत्ता निकष. स्मार्ट आपले सेवा केंद्र दर्जा देण्याची नवीन योजना घोषित करण्यात आली यामध्ये राज्य, विभागीय व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येतील दरवर्षी ३५० पेक्षा अधिक केंद्रांचा गौरव करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi