आरोग्य क्षेत्रात व्यापक विस्तार
आरोग्यसेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार पॅकेजेसची संख्या २३९९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात ४५३७ रुग्णालये या योजनांशी संलग्न करण्यात आली आहेत.
शहरी भागांसाठी स्वतंत्र शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापन करण्यात आले असून ११ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे काम सुरू आहे. मेडिसिटी संकल्पनेद्वारे वैद्यकीय शिक्षण, संशोधन, तृतीयक आरोग्यसेवा आणि आयुष प्रणाली यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
No comments:
Post a Comment