मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा
- पालकमंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, दि. 8 : मुंबईकरांना जागतिक दर्जाची आणि अधिक कार्यक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, तसेच प्रशासकीय कार्यपद्धतीचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा सुचविणारा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. महानगरपालिका रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि स्वच्छतागृहांची स्थिती तातडीने सुधारण्याचे आदेश देत आरोग्य सेवांचा नियमित आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आधुनिकीकरणासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
. जागतिक आणि राष्ट्रीय निकषांनुसार आरोग्य सेवा उभारण्यासाठी आर्थिक तरतुदींपलीकडे जाऊन आधुनिक ‘मेडिटेक’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment