Tuesday, 16 June 2026

दादर आयटीआयमध्ये ऑगस्ट 2026 सत्रासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू pl share

 दादर आयटीआयमध्ये ऑगस्ट 2026 सत्रासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

 

मुंबई, दि. 15 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), दादर, मुंबई येथे शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य व्ही. जे. संखे यांनी दिली आहे.

 

        प्रवेश अर्ज, प्रवेश पद्धती, नियमावली तसेच वेळापत्रक यासंदर्भातील सविस्तर माहिती प्रवेश संकेतस्थळ admission.dvet.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अथवा इतर शंकांचे निरसन करण्यासाठी संचालनालयाच्या मदत कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, मदत कक्षाशी संपर्क साधण्यापूर्वी उमेदवारांनी माहितीपुस्तिकेचा अभ्यास करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 

ऑगस्ट 2026 सत्रासाठी संस्थेमध्ये कम्प्युटर हार्डवेअर अॅण्ड नेटवर्क मेंटेनन्स या एक वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी 48 जागा उपलब्ध आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स, मॅकेनिक मोटार व्हेईकल आणि टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्स या प्रत्येकी दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी 24-24 जागा उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेतील अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी 9967834600 किंवा 9594026004 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही. जे. संखे यांनी केले आहे.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi