Saturday, 16 May 2026

POSH अनुपालनासाठी विशेष तपासणी सूची तयार केली असून, त्यामध्ये POSH धोरण,

 महिला व बाल विकास विभागाने POSH अनुपालनासाठी विशेष तपासणी सूची तयार केली असून, त्यामध्ये POSH धोरण, जनजागृती कार्यक्रम, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, वार्षिक अहवाल, सुरक्षित कार्यस्थळ आणि SHE-Box पोर्टलवरील नोंदणी यांसारख्या ३१ मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून प्रत्येक आस्थापनामध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे.

तपासणीदरम्यान त्रुटी आढळल्यास POSH Act 2013 च्या कलम २६ नुसार संबंधित आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि संवेदनशील कार्यस्थळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi