Wednesday, 6 May 2026

विकासकांकडून मालमत्तेच्या प्रमाणाची थकीत रक्कमेच्या वसुली संदर्भात

 विकासकांकडून मालमत्तेच्या प्रमाणाची थकीत रक्कमेच्या वसुली संदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे प्रभारी मंत्री मा. शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अतुल भातखळकर उपस्थित होते. विकासकांकडून थकीत रक्कमेची वसुलीला होत असलेल्या विलंबाचा मुद्द्यावर कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या पाठपुराव्यासाठी ही बैठक प्रभारी मंत्री मा. शंभूराजे देसाई आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.


बैठकीदरम्यान मा. शंभूराजे देसाई यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विकासकांकडील थकीत रक्कमेची वसुली एका महिन्याच्या आत जमा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विकासकांकडून दंड वसुलीचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंतही पोहोचले नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

बैठकीत त्यांनी थकीत रक्कमेच्या वसुली प्रक्रियेला गती देण्याची मागणी करत संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली. महारेराकडून यासंदर्भात सुधारित निर्देश जारी करण्यात आले असूनही अपेक्षित गतीने वसुली होत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी मा. शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, थकीत दंड वसुलीच्या प्रक्रियेत अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
आगामी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा उपस्थित करणार असल्याचे आमदार अतुल भातखळकर यांनी बैठकीत सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi