Wednesday, 6 May 2026

राज्यपालांच्या पुढाकाराने मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये ‘टीबी मुक्त भारत’ अभियान राबवणार

 राज्यपालांच्या पुढाकाराने मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये ‘टीबी मुक्त भारत’ अभियान राबवणार

·         अभियानात रेड क्रॉस तसेच विद्यापीठांना सहभागी करणार असल्याची राज्यपालांची माहिती

 

मुंबई, दि.५ : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये 'टीबी मुक्त भारत' अभियान राबवले जाईल व राज्याचा आरोग्य विभाग, मुंबई महानगर पालिका तसेच रेड क्रॉस सोसायटी व विद्यापीठांना या कार्यात सहभागी केले जाईल, अशी माहिती राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दिली.

राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी रेड क्रॉस सोसायटीच्या महाराष्ट्र शाखेची बैठक संपन्न झाली तसेच राज्यातील तीन विद्यापीठांच्या कुलगुरुंची स्वतंत्रपणे बैठक झाली, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. 

पंतप्रधानांच्या सूचनेनुसार देशव्यापी ‘टीबी मुक्त भारत’ अभियान राबवले जात आहे. परंतु लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये क्षयरोगाचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील कुर्ला तसेच इतर भागांमधील झोपडपट्ट्यांमध्ये टीबीमुक्त भारत अभियान राबवले जाईल असे राज्यपालांनी जाहीर केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi