Saturday, 11 April 2026

जिवन गाणे खूप छान कविता आहे , जरूर वाचा ... 🙏 💐 *शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्यावे* *भुत होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून अजरामर व्हावे.* 💐 💐 *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू* *डोक्यात राग भरल्यावर* *फुटणार कसं हसू ?*💐 💐 *अहंकार बाळगू नका* *भेटा बसा बोला* *मेल्यावर रडण्यापेक्षा* *जिवंतपणी बोला* 💐 💐 *नातं आपलं कोणतं आहे* *महत्वाचे नाही* *प्रश्न आहे कधीतरी* *गोड बोलतो का नाही ?*💐 💐 *चुका शोधत बसाल तर* *सुख मिळणार नाही* *चूक काय बरोबर काय* *कधीच कळणार नाही* 💐 💐 *काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू .....ll 1 ll*💐 💐 *चल निघ चालता हो* *इथे थांबू नको* *हात जोडून विनंती आहे* *अशी भाषा नको*💐 💐 *दारात पाय नको ठेऊ* *तोंड नाही पहाणार* *खरं सांगा असं वागून* *कोण सुखी होणार ?*💐 💐 *तू तिकडे आम्ही इकडे* *म्हणणं सोपं असतं* *पोखरलेलं मन कधीच* *सुखी होत नसतं*💐 💐 *सुखाचा अभास म्हणजे* *खरं सुख नाही* *आपलं माणूस आपलं नसणे* *दुसरं दुःख नाही* 💐 💐 *करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ....ll 2 ll*💐 💐 *एकतर्फी प्रेम करून* *उपयोग आहे का ?* *समोरच्याला आपली आठवण* *कधी तरी येते का ?*💐 💐 *नातं टिकलं पाहिजे असं* *दोघांनाही वाटावं* *कधी गायीने कधी वासराने* *एकमेकाला चाटावं*💐 💐 *तुमची काहीच चूक नाही* *असं कसं असेल* *पारा शांत झाल्यावरच* *सत्य काय ते दिसेल*💐 💐 *बघा जरा एकांतात* *डोळे मिटून आत* *चूक कबूल करतांना* *जोडताल दोन्ही हात*💐 💐 *अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू* *आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 3 ll*💐 💐 *दुसऱ्याला दोष देणं* *खूप सोपं असतं* *वेळ आल्यावर कळतं की* *कुणी कुणाचं नसतं*💐 💐 *भेटत नाहीत बोलत नाहीत* *गुन्हा तरी काय ?* *जे वाटतं ते बोलून* *रड धाय धाय*💐 💐 *शक्य आहे ताण जाऊन* *वाटेल हलकं हलकं* *गुळणी धरून बसू नका* *व्हा थोडं बोलकं*💐 💐 *कोण चूक कोण बरोबर* *हिशोब करून टाका* *प्रत्येक क्षण जगून घ्या* *घालवू नका मोका*💐 💐 *त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू* *आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू ....ll 4 ll*💐 💐 *आपली मतं दुसऱ्यावर* *मुळीच लादू नका* *समोरच्या व्यक्तीचा* *अंत बघू नका*💐 💐 *कोणताही विषय असो* *जास्त नका ताणू* *मीच शहाणा बाकी मूर्ख* *असे नका मानू*💐 💐 *कोण म्हणतं गोड बोलून* *प्रश्न सुटत नाही* *अनेकदा समजूतदार* *माणूस भेटत नाही*💐 💐 *जिभेवर साखर ठेवा* *होणार नाही वाद* *आवडल्यावर मनातून* *द्या की हो दाद*💐 💐 *तडतड बोलून उगीच मनं नका नासु* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ....ll 5 ll*💐 💐 *बचतच कामी येते* *खर्च कमी कर* *जरी मोठा झालास तरी* *रहा जमिनीवर*💐 💐 *विचार करून पाऊल टाका, कुठे नका फसू* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ....ll 6 ll*💐 💐 *ठीक आहे चूक नाही* *तरीही जुळतं घ्या* *बॉडी डेड होण्या आधीच* *आलिंगन द्या*💐 💐 *स्मशानभूमीत चांगलं बोलून* *काय उपयोग आहे* *जिवंतपणी कसे वागलात* *जास्त महत्वाचं आहे*💐 💐 *माझ्या कवितेत कोणतंही* *तत्वज्ञान नाही* *तुम्ही खुशाल म्हणू शकता* *कवीला भान नाही*💐 💐 *ठीक आहे तुमचा आरोप* *मान्य आहे मला* *माझं म्हणणं एवढंच आहे* *वाद नको बोला* 💐 💐💐💐💐 *काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ...ll 7 ll* *नुसते वाचून सोडू नका यात आपण कुठे बसतोय यावर विचार करा.* *आपलं नातं कसं एल आय सी सारखं* *जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी* 🙏🙏🙏

 खूप छान कविता आहे , जरूर वाचा ... 🙏


💐 *शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्यावे* 

*भुत होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून अजरामर व्हावे.* 💐


💐 *आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू* 

*डोक्यात राग भरल्यावर* 

*फुटणार कसं हसू ?*💐


💐 *अहंकार बाळगू नका* 

*भेटा बसा बोला* 

*मेल्यावर रडण्यापेक्षा*

*जिवंतपणी बोला* 💐


💐 *नातं आपलं कोणतं आहे*

*महत्वाचे नाही*

*प्रश्न आहे कधीतरी*

*गोड बोलतो का नाही ?*💐


💐 *चुका शोधत बसाल तर*

*सुख मिळणार नाही* 

*चूक काय बरोबर काय*

*कधीच कळणार नाही* 💐


💐 *काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू*

*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू .....ll 1 ll*💐


💐 *चल निघ चालता हो*

*इथे थांबू नको*

*हात जोडून विनंती आहे*

*अशी भाषा नको*💐


💐 *दारात पाय नको ठेऊ* 

*तोंड नाही पहाणार* 

*खरं सांगा असं वागून* 

*कोण सुखी होणार ?*💐


💐 *तू तिकडे आम्ही इकडे*

*म्हणणं सोपं असतं*

*पोखरलेलं मन कधीच* 

*सुखी होत नसतं*💐


💐 *सुखाचा अभास म्हणजे* 

*खरं सुख नाही* 

*आपलं माणूस आपलं नसणे*

*दुसरं दुःख नाही* 💐


💐 *करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु*

*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू ....ll 2 ll*💐


💐 *एकतर्फी प्रेम करून*

*उपयोग आहे का ?*

*समोरच्याला आपली आठवण*

*कधी तरी येते का ?*💐


💐 *नातं टिकलं पाहिजे असं*

*दोघांनाही वाटावं*

*कधी गायीने कधी वासराने* 

*एकमेकाला चाटावं*💐


💐 *तुमची काहीच चूक नाही* 

*असं कसं असेल* 

*पारा शांत झाल्यावरच* 

*सत्य काय ते दिसेल*💐 


💐 *बघा जरा एकांतात*

*डोळे मिटून आत*

*चूक कबूल करतांना*

*जोडताल दोन्ही हात*💐


💐 *अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू*

*आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 3 ll*💐


💐 *दुसऱ्याला दोष देणं*

*खूप सोपं असतं*

*वेळ आल्यावर कळतं की*

*कुणी कुणाचं नसतं*💐


💐 *भेटत नाहीत बोलत नाहीत*

*गुन्हा तरी काय ?*

*जे वाटतं ते बोलून*

*रड धाय धाय*💐


💐 *शक्य आहे ताण जाऊन*

*वाटेल हलकं हलकं*

*गुळणी धरून बसू नका*

*व्हा थोडं बोलकं*💐


💐 *कोण चूक कोण बरोबर*

*हिशोब करून टाका*

*प्रत्येक क्षण जगून घ्या*

*घालवू नका मोका*💐


💐 *त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू*

*आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू ....ll 4 ll*💐


💐 *आपली मतं दुसऱ्यावर*

*मुळीच लादू नका*

*समोरच्या व्यक्तीचा*

*अंत बघू नका*💐


💐 *कोणताही विषय असो*

*जास्त नका ताणू*

*मीच शहाणा बाकी मूर्ख*

*असे नका मानू*💐


💐 *कोण म्हणतं गोड बोलून*

*प्रश्न सुटत नाही*

*अनेकदा समजूतदार*

*माणूस भेटत नाही*💐


💐 *जिभेवर साखर ठेवा*

*होणार नाही वाद*

*आवडल्यावर मनातून*

*द्या की हो दाद*💐


💐 *तडतड बोलून उगीच मनं नका नासु*

*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू ....ll 5 ll*💐


💐 *बचतच कामी येते*

*खर्च कमी कर*

*जरी मोठा झालास तरी*

*रहा जमिनीवर*💐


💐 *विचार करून पाऊल टाका, कुठे नका फसू*

*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू ....ll 6 ll*💐


💐 *ठीक आहे चूक नाही* 

*तरीही जुळतं घ्या* 

*बॉडी डेड होण्या आधीच* 

*आलिंगन द्या*💐


💐 *स्मशानभूमीत चांगलं बोलून*

*काय उपयोग आहे* 

*जिवंतपणी कसे वागलात*

*जास्त महत्वाचं आहे*💐


💐 *माझ्या कवितेत कोणतंही*

*तत्वज्ञान नाही* 

*तुम्ही खुशाल म्हणू शकता*

*कवीला भान नाही*💐


💐 *ठीक आहे तुमचा आरोप*

*मान्य आहे मला*

*माझं म्हणणं एवढंच आहे*

*वाद नको बोला* 💐


💐💐💐💐

*काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू*

*आयुष्य खूप छोटं आहे*

*भांडत नका बसू ...ll 7 ll*


*नुसते वाचून सोडू नका यात आपण कुठे बसतोय यावर विचार करा.*

*आपलं नातं कसं एल आय सी सारखं*

*जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी*

 🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi