भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटचे औपचारिक उद्घाटन १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे म्हणाले की, “चैत्यभूमी, मुक्तीभूमी, दीक्षाभूमी सारखी ठिकाणे फक्त धार्मिक स्थळे नसून या ठिकाणांना सामाजिक परिवर्तनाचे महत्त्व आहे. टूर सर्कीट सहल या उपक्रमाद्वारे समतेचा संदेश सर्वदूर पोहोचविण्याचा आमचा मुख्य हेतू आहे. नव्या पिढीला सदर टूर सर्कीट सहलीमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान, त्यांचे विचार जवळून अनुभवता येतील. या उपक्रमामध्ये अधिकाधिक पर्यटक सहभागी होतील असा आम्हाला विश्वास आहे.”
पर्यटन संचालक डॉ. बी.एन.पाटील म्हणाले की“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, त्यांचे कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. हेच लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त टूर सर्कीट सहलीचा उपक्रम पर्यटन विभागाने हाती घेतला आहे. यासाठी पर्यटन विभागाने सखोल नियोजन केले आहे. या टूर सर्कीट सहलीद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास, त्यांचे कार्य व विचार समजून घेण्यास पर्यटकांना मदत होईल.”
टूर सर्कीटची वैशिष्ट्ये
आयोजनाची ठिकाणे – मुंबई , नाशिक आणि नागपूर
कालावधी – दि. 13 व 14 एप्रिल, 2026
सुविधा – प्रत्येक शहरात दोन बसेसद्वारे सहल, टूर मार्गदर्शक, अल्पोपहार, पिण्याचे पाणी
सहलीसाठी संपर्क –
मुंबईसाठी संपर्क - पवन पवार : 7666603211, सूरज चतुर्वैदी : 8108175530
नाशिकसाठी संपर्क – तुषार शिंदे : 9890255157, ऋषिकेश चव्हाण : 8806841468
नागपूरसाठी संपर्क - अविनाश गजघाटे : 9823111203
0000
No comments:
Post a Comment