Wednesday, 22 April 2026

लाईव्ह ट्रॅकिंग व पूर्ण पारदर्शकता - तक्रार नोंदल्यानंतर विद्यार्थ्याला एक विशिष्ट 'तक्रार क्रमांक' (Grievance ID) मिळतो

 काही वर्षांपासून परीक्षा निकालातील विलंब, गुणपत्रिकांमधील त्रुटी तसेच तक्रार नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष लोणेरे येथे उपस्थित राहण्याची अट यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विषयाची गंभीर दखल घेत सातत्याने आढावा बैठका घेतल्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अनुभवी शिक्षणतज्ज्ञ डॉ. राजनीश कामत यांची कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. डॉ. कामत यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव आणि कुलसचिव डॉ. शेष यांच्या समन्वयातून विद्यापीठाने तब्बल 85 टक्के परीक्षा निकाल यशस्वीपणे जाहीर केले. या कामगिरीसह ‘ई-निरसन’ प्रणालीमुळे तक्रार निवारणाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि कार्यक्षम होणार आहे.

लाईव्ह ट्रॅकिंग व पूर्ण पारदर्शकता - तक्रार नोंदल्यानंतर विद्यार्थ्याला एक विशिष्ट 'तक्रार क्रमांक' (Grievance ID) मिळतो. या क्रमांकाच्या सहाय्याने विद्यार्थी ॲपवर आपल्या तक्रारीची सद्यस्थिती कधीही, कुठूनही तपासू शकतो. तक्रार कोणत्या विभागाकडे आहे, कोण हाताळत आहे आणि कधी सोडवली जाईल, या सर्व माहितीचे रियल-टाइम अपडेट मिळतात. प्रत्येक टप्प्यावर एसएमएस व ईमेलद्वारे विद्यार्थ्याला सूचना दिली जाते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi