Wednesday, 22 April 2026

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न -

  

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

·         ई-निरसन’ प्रणालीचा शुभारंभ

मुंबईदि. 22 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ई-निरसन’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली विकसित केली असून  विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने  सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांदादा पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात ई-निरसन प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डीतंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकरप्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामतपरीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव तसेच कुलसचिव डॉ. शेष उपस्थित होते.

            मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,  विद्यार्थ्यांना परीक्षा निकालगुणपत्रिकापुनर्मूल्यांकनप्रमाणपत्र आदी संदर्भातील तक्रारींसाठी प्रत्यक्ष लोणेरे येथे जाण्याची आवश्यकता भासू नयेयासाठी ई-निरसन’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण करून त्या संबंधित विभागाकडे तत्काळ पाठवते. तसेच विद्यार्थ्यांना तक्रारीची सद्यस्थिती लाइव्ह ट्रॅकिंगद्वारे पाहता येते. या प्रणालीमुळे तक्रार निवारण प्रक्रिया अधिक जलदपारदर्शक व कार्यक्षम होणार असून विद्यार्थ्यांचा वेळ व खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi